टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय | Tomato sauce making business | Best Business Ideas 2024 –

टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय | Tomato sauce making business | Business Ideas 2024 –

      आज काल लोकांना बऱ्याच खाद्यपदार्थासोबत टोमॅटो सॉस खाणे आवडते. लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट आणि चविष्ट अन्न खाणे आवडते तसेच फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे जरी शरीरासाठी चांगले नसले तरी देखील बहुतेक लोक फास्ट फूड खाणे पसंत करतात आणि बहुतेक फास्ट फूड सोबत टोमॅटो सॉस खाल्लाच जातो. फक्त फास्ट फूड सोबतच नव्हे तर इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांसोबत टोमॅटो सॉस खाल्ला जातो. टोमॅटो सॉसचा उपयोग रेसिपीज मध्ये सुद्धा केला जातो.टोमॅटो सॉसची मागणी हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये जास्त प्रमाणात असते. त्यामुळे टोमॅटो सॉसचा बिजनेस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तुम्ही देखील टोमॅटो सॉस बनवण्याचा बिझनेस ( Tomato sauce making business) सुरू करू शकता आणि त्यामध्ये नफा मिळवू शकता.

Tomato sauce making business

Table of Contents

– टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसायासाठी व्यवसाय योजना तयार करा.

– टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे जसे की कच्चा माल, आवश्यक परवाने,काही मशीनरी आणि कामगार हवे असल्यास. या गोष्टींसोबत टोमॅटो बनवण्याचा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो, अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन व्यवसाय योजना तयार करा.

– टोमॅटो सॉस बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारी आवश्यक सामग्री ठेवण्यासाठी जागा, मशीन ठेवण्यासाठी जागा त्याचबरोबर इतर सेटअप साठी आवश्यक जागा लक्षात घेऊन योग्य त्या ठिकाणाची निवड करा.

१. टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारा मुख्य कच्चा माल टोमॅटो आहे. तुम्ही मोठ्या मार्केटमधून होलसेल दरात टोमॅटो खरेदी करू शकता किंवा थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून टोमॅटोची खरेदी करू शकता. टोमॅटोचा दर सीजननुसार कमी जास्त होत राहतो.

२.याशिवाय, तुम्हाला या व्यवसायात आणखी काही गोष्टींची आवश्यकता असेल जसे की साखर, विनेगर, ग्लुकोज सिरप ,काही फ्लेवर्स तसेच मीठ इत्यादी.

३.यासोबतच तुम्हाला कांदे, मसाले, काळी मिरी, मोहरी, आले आणि इतर मसाल्यांशी संबंधित गोष्टींची आवश्यकता असेल जी तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केट मधून तुम्ही खरेदी करू शकता.

४.टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्ही कोणत्या पद्धतीची रेसिपी फॉलो करत आहात त्यानुसार थोड्याफार प्रमाणात बदलू शकतात.

५. टोमॅटो सॉस देखील विविध प्रकारे बनवला जाऊ शकतो तसेच टोमॅटो सॉस चे विविध प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे :

 – प्लेन टोमॅटो केचप

– नो गार्लिक नो ओनियन टोमॅटो केचप

– स्वीट अँड स्पायसी टोमॅटो सॉस

– ऑरगॅनिक टोमॅटो सॉस

– चिली टोमॅटो सॉस

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारे मशीन पुढील प्रमाणे आहेत – 

१ . टोमॅटो पल्पिंग मशीन 

२ . स्पेस ग्राइंडिंग मशीन 

३ . बॉटल वॉशिंग मशीन 

४ . क्राउन कॉर्किंग मशीन 

५ . एक्झॉस्ट आणि प्रोसेसिंग मशीन 

६ . बॉयलर  

– जीएसटी रजिस्ट्रेशन

– FSSAI (food safety and standards authority of India) लायसन्स – हे लायसन्स कुठलाही अन्नपदार्थांशी निगडित व्यवसाय सुरू केल्यानंतर आवश्यक असते. हे लायसन्स असल्यामुळे ग्राहकाच्या मनात आपल्या उत्पादनाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो.

– MSME ( Ministry of Micro, Small & Medium Enterprises ) रजिस्ट्रेशन

– NOC by state pollution control board 

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट

– इतर आवश्यक परवाने

–  व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असल्यास काही कामगारांची आवश्यकता नक्कीच भासते. – टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणाऱ्या मशीनचा वापर कसा करावा तसेच इतर उपकरणे कशी हाताळावी याबद्दलची माहिती तसेच ट्रेनिंग कामगारांना देऊन सुरक्षा आणि खबरदारी कशी बाळगावी हे देखील समजून सांगावे. – टोमॅटो सॉस बनवण्याच्या व्यवसायासाठी साधारणतः एक कुशल आणि दोन अकुशल कामगारांची आवश्यकता आहे.

टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे  कमीत कमी दोन लाखांपर्यंत गुंतवणूक लागू शकते.

– तुम्ही तयार करत असलेल्या टोमॅटो सॉसला काहीतरी  कॅची असे आणि ग्राहकांना आकर्षक वाटेल असे नाव देऊ शकता.

– सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत टोमॅटो सॉसची मार्केटिंग करण्यासाठी वापरू शकता.

– व्यवसायाच्या सुरुवातीस टोमॅटो सॉसची मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही ठीक – ठिकाणी बॅनर्स लावू शकता .

– तसेच वर्तमानपत्रे, लोकल चॅनेल, एफ एम रेडिओ यावर देखील जाहिरात देऊ शकता.

– तसेच टोमॅटो सॉस बद्दल माहिती असलेले पॅम्प्लेट्स तयार करून ते देखील वाटू शकता.

– तसेच टोमॅटो सॉस ऑफलाइन पद्धती सोबतच ऑनलाईन पद्धतीने देखील विकले जाऊ शकतात. आजकाल विविध वेबसाईट उपलब्ध आहेत त्यावर या प्रकारचे उत्पादने विकली जातात.

– तसेच विविध प्रकारच्या ऑफर्स तुम्ही सुरुवातीला ठेवू शकता ,उदाहरणार्थ –  बाय वन गेट वन ऑफर.

        अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो सॉस बनवण्याचा ( Tomato sauce making business)व्यवसाय सुरू करू शकता.

⭕ आपली मूलभूत गरज,घरातून सुद्धा सुरू करता येणारा व्यवसाय

⭕असंख्य लोक करतात तरीही फायदेशीर ठरणारा व्यवसाय.. 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕ CGTMSE scheme 

⭕ क्रेडिट गॅरंटी स्कीम

⭕ मिळवा व्यवसायासाठी कर्ज, जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/cgtmse-scheme/

Leave a Comment