हल्ली कुठल्याही खाऊ गल्लीमधील फेमस पदार्थ | Potato Twister business| पोटॅटो ट्विस्टर्स बिजनेस | Latest best business ideas 2024

हल्ली कुठल्याही खाऊ गल्लीमधील फेमस पदार्थ | Potato Twister business| पोटॅटो ट्विस्टर्स बिजनेस –

पोटॅटो ट्विस्टर्स बिजनेस | Potato Twister business –

     पूर्वीपासूनच बटाट्यापासून विविध पदार्थ बनवले जातात त्यामध्ये बटाट्याच्या पापड्या ,वेफर्स, बटाट्याचा चिवडा किंवा इतर अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात. परंतु हल्ली ट्रेनडिंग असलेला खाद्यपदार्थ म्हणजे पोटॅटो ट्विस्टर्स. पोटॅटो ट्विस्टर्सची क्रेझ अगदी लहानाग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे.पोटॅटो ट्विस्टर्स या खाद्यपदार्थाने खाऊ गल्ली मध्ये धुमाकूळ एंट्री घेतली आहे, लोक सुद्धा या खाद्यपदार्थाला भरघोस प्रतिसाद देत आहेत. काही भागांमध्ये हा पदार्थ मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु काही भागात हा पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध नाही आणि याच संधीचा फायदा आपण घेऊ शकतो ज्या ठिकाणी हा खाद्यपदार्थ विक्रीसाठी नाही अशा ठिकाणी पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसाय ( Potato Twister business) सुरू करू शकतो. जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मटेरियल |  Material required to start a Potato Twisters business –

– पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसायासाठी बटाटा हा मुख्यमाल आहे.त्यानंतर तेल, पाणी, मीठ,मैदा,कॉर्नफ्लॉवर, लाल मिरची पावडर, विनेगर इत्यादी लागेल.

– बांबू स्टिक्स

–  पोटॅटो ट्विस्टर्स बनवण्यासाठी आवश्यक मशीन,फ्रायर्स

– झाऱ्या,कढई यांसारखी इतर छोटी मोठी आवश्यक भांडी

–  प्लेट्स किंवा इतर आवश्यक सामग्री

( जर पोटॅटो ट्विस्टर्स विविध फ्लेवर मध्ये बनवणार असू तर सामग्री मध्ये काही बदल होऊ शकतात.)

पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसायासाठी आवश्यक मशिन्स | Necessary machines for potato Twister business –

पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसायासाठी मशीन पुढील प्रकारात उपलब्ध आहेत :

१) मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन 

२) ऑटोमॅटिक ऑर इलेक्ट्रॉनिक पोटॅटो ट्विस्टर मशीन 

१) मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन –

– हे मशीन इलेक्ट्रॉनिक किंवा ऑटोमॅटिक मशीन पेक्षा कमी दरामध्ये मिळते ,त्यामुळे ज्यांना कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हे मशीन योग्य असेल.

– साधारणतः हजार रुपयांपर्यंत हे मशीन मिळू शकते परंतु मशीनच्या कॉलिटीनुसार किमतीमध्ये थोडाफार फरक पडू शकतो.

– आपल्या जवळील लोकल मार्केटमध्ये सुद्धा हे मशीन मिळेल किंवा इंडिया मार्ट ॲमेझॉन यांसारख्या वेबसाईटवरून सुद्धा मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन खरेदी करता येते.

– ज्या ठिकाणी विजेची सुविधा नाही त्या ठिकाणी किंवा स्टॉलवर जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन योग्य राहील.

२) ऑटोमॅटिक ऑर इलेक्ट्रॉनिक पोटॅटो ट्विस्टर मशीन –

– हे मशीन मॅन्युअल मशीन पेक्षा महाग असते परंतु हे मशीन ऑटोमॅटिक असल्याकारणाने मेहनत कमी लागते आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन घेता येते.

– ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी उपलब्ध असेल उदाहरणार्थ हॉटेल, कॅफे अशा ठिकाणी हे मशीन वापरता येऊ शकते.

– लोकल मार्केट मधून हे मशीन आपण खरेदी करू शकतो किंवा इंडिया मार्ट वर 35 हजार रुपयांमध्ये स्टेनलेस स्टील ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन उपलब्ध आहे.

पोटॅटो ट्विस्टर फ्रायर  –

– जर आपण कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय करणार असू तर कढाई आणि झाऱ्याच्या सहाय्याने पोटॅटो ट्विस्टर तळू शकतो, परंतु जर उत्पादन जास्त घ्यायचे असेल आणि गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर पोटॅटो ट्विस्टर फ्रायर खरेदी करू शकतो.

– पोटॅटो ट्विस्टर फ्रायरच्या लिटरच्या कॅपॅसिटीनुसार किमती  बदलतात.

उदाहरणार्थ,

– Kobbey इलेक्ट्रिक डीप फ्रायर मशीन ज्याची कॅपॅसिटी 6 लिटर असून हे मशीन ॲमेझॉन वर सध्या 3,397 रुपयांना उपलब्ध आहे.

– Potato Twister Fryer, 3 Kv हे मशीन इंडिया मार्ट वर दहा हजार रुपयांना उपलब्ध आहे.

  अशाप्रकारे कॅपॅसिटीनुसार पोटॅटो ट्विस्टर फायरच्या किमतीमध्ये बदल होतो. आपल्या आवडीनुसार पोटॅटो ट्विस्टर फ्रायर आपण खरेदी करू शकतो.

पोटॅटो ट्विस्टर व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन |Profit margin in a potato twister business –

 एक किलो बटाट्याची किंमत : 20 ते 30 रुपये मानू.

समजा वीस रुपये किलोने आपण बटाटे खरेदी केले आणि त्यामध्ये दहा मध्यम आकाराचे बटाटे आले.

तर एक बटाटा दोन रुपयाला पडला.

एक पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी एक बटाटा आणि एक बांबू स्टिक लागेल.

एका बटाट्याची किंमत : 2 रूपये

एका बांबू स्टिक ची किंमत : 1 रुपया

लेबर, इलेक्ट्रिसिटी आणि पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी लागणारे बॅटर : 3 रुपये

एकूण खर्च : 6 रुपये.

– आपल्या परिसरानुसार पोटॅटो ट्विस्टर किती किमतीला विकायचे हे आपण ठरवू शकतो कमीत कमी 20 रुपयापासून किंमत आपण ठरवू शकतो.

 – जर आपण गर्दीच्या ठिकाणी किंवा या व्यवसायासाठी योग्य ठिकाणी निवडले आणि एका दिवसात 20 रुपये किमतीचे 50 पोटॅटो ट्विस्टर विकले तरीसुद्धा महिन्याला तीस हजार रुपये कमावू शकतो.

https://iconikmarathi.com/baby-care-kit-yojana/

Leave a Comment