सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण आपले स्वास्थ्य आणि मन व्यवस्थित राखणे म्हणजेच आरोग्य चांगले ठेवणे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहणे गरजेचे आहे. परंतु आपल्या स्वतःसोबत किंवा आपल्या आसपास अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपोआपच आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो परंतु निगेटिव्ह विचार न करता नेहमी सकारात्मक आणि चांगला विचार केला पाहिजे त्यासाठी काही Positive mindset tips आज आपण पाहणार आहोत. चला तर बघुयात सकारात्मक विचार कसा करावा..
Tips for positive thinking in Marathi | सकारात्मक विचार कसा करावा
1. कृतज्ञता सराव | Gratitude practice :
आपल्याला ज्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत म्हणजेच आपल्याकडे सध्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल नेहमीच कृतज्ञ असावे. आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहोत त्याबद्दल विचार करून दिवसाची सुरुवात आणि शेवट करा. असे केल्यामुळे आपले लक्ष जीवनामधील सकारात्मक पैलूंवर केंद्रित होते आणि आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सुद्धा मिळू लागतात.
2. Mindful Breathing | माइंडफुल ब्रीदिंग:
प्रत्येकालाच काही ना काही तरी ताणतणाव नक्कीच असतात आणि हे ताण तणाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने दीर्घ श्वासोच्छ्वासाचा व्यायाम/ माईंड फुल ब्रीदिंग केले पाहिजे.
3. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स | Positive Affirmations:
आशावादी दृष्टीकोन मजबूत करण्यासाठी आणि नकारात्मक विचारांचा प्रतिकार करण्यासाठी सकारात्मक अफर्मेशन्स तयार करा आणि त्यांची पुनरावृत्ती करा.
4. Surround Yourself with Positivity | सकारात्मकतेने स्वत:ला घेरून घ्या :
आपण नेहमी अशा लोकांच्या सहवासात राहिले पाहिजे की जे सकारात्मक विचार करतात ,त्यांचे विचार चांगले आहेत, आपल्याशी त्यांचे नातेसंबंध चांगले आहे. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळे आपण सुद्धा सकारात्मकतेने घेरलेलो असतो म्हणजेच आपण सुद्धा सकारात्मकच विचार करतो.
5. Learn from Challenges | आव्हानांमधून शिका:
तुमच्या समोर जे काही चॅलेंजेस येतात त्यांना ते चॅलेंजेस आपली ग्रोथ करण्यासाठी आलेले आहेत अशा रीतीने त्यांच्याकडे एक संधी म्हणून बघा. आपला वैयक्तिक विकास होण्यासाठी आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांपासून दुर न पडता त्यांना सामोरे जा असे केल्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात.
6. Healthy Lifestyle Choices | आरोग्यदायी जीवनशैली निवडा :
नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे हे सकारात्मक मानसिकतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात.
7. Focus on Solutions | सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करा:
जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या येतात त्यावेळी आपण एक चूक करतो की आपलं लक्ष पूर्ण त्या समस्येवर घालवतो परंतु त्या ऐवजी त्या समस्या पासून सुटका करून घेण्यासाठी त्यावर उपाय शोधण्याकडे आपले लक्ष केंद्रित करा.
8. Mindful Media Consumption | माइंडफुल मीडिया उपभोग :
तुम्ही बघत असलेल्या कंटेंट बद्दल निवडक व्हा. नकारात्मक कन्टेन्ट बघणे टाळा, माहितीपूर्ण आणि सकारात्मक कंटेंटला प्राधान्य द्या.
9. Celebrate Small Wins | छोटे विजय साजरे करा :
तुमचे यश कितीही लहान असले तरीही त्याचा आनंद घ्या आणि साजरे करा. याच प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद मानायला शिकले पाहिजे.
10. Practice Self-Compassion | आत्म-करुणा सराव:
स्वतःशी दयाळू व्हा म्हणजेच आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाकडून काही ना काही तरी चूक होतच असते परंतु ती चूक आपण सुधारली पाहिजे.
अशाप्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये या positive thinking tips वापरून सकारात्मक विचार करू शकतो.