Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना –
केंद्र सरकार तर्फे आणि राज्य सरकार तर्फे महिलांसाठी इतर नागरिकांसाठी, लहानग्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा विविध योजना सुरू केल्या जातात. आजच्या लेखामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या एका योजनेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ती योजना आहे ,ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( Senior Citizen Saving Scheme ).
Table of Contents
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना –
– ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही 2004 मध्ये सुरू करण्यात आलेली असून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून हमी परतावा मिळावा यासाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे.
– साठ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक चांगली योजना असून चांगला बचत पर्याय उपलब्ध करून देते.
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमुळे रिटायर झाल्यानंतर किंवा साठ वर्षानंतर ज्या नागरिकांना त्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन जाते किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण होऊन जाते अशा नागरिकांना चांगला हातभार लागणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेसोबत किंवा पोस्ट ऑफिस सोबत संपर्क करू शकता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी मिळणारे व्याजदर | Interest rate for senior citizen Saving Scheme –
8.2% टक्के व्याजदर या योजनेसाठी मिळतो परंतु व्याजदरामध्ये बदल होऊ शकतो.
मॅच्युरिटी पिरियड –
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी अकाउंट उघडल्यानंतर पाच वर्षाचा मॅच्युरिटी पिरेड असतो म्हणजेच पाच वर्षानंतर आपण पैसे काढू शकतो.
– परंतु जर आपल्याला मॅच्युरिटी पिरेड वाढवून घ्यायचा असेल तर मॅच्युरिटी पिरियडच्या एक वर्षापूर्वीच तसे कळवणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत मॅच्युरिटी पिरेड वाढवता येऊ शकतो.
किमान गुंतवणूक –
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी कमीत कमी गुंतवणूक 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.
कमाल गुंतवणूक –
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे, 1 एप्रिल 2023 पासून या योजनेसाठी कमाल मर्यादा 30 लाख रुपये लागू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पात्रता | Eligibility for senior citizen Saving Scheme –
– 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
– तसेच 55 ते 60 वर्ष वयोगटातील नागरिक ज्यांनी स्वइच्छेने रिटायरमेंट घेतली आहे असे व्यक्ती सुद्धा सहभागी होऊ शकतात.
– जे जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त झालेले संरक्षण कर्मचारी आहे आणि किमान वय साठ वर्षे आहे असे नागरिक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
– हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) आणि अनिवासी भारतीय (NRI) या योजनेसाठी पात्र नाहीत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे | Benefits of senior citizen Saving Scheme –
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी भारत सरकारचे समर्थन असल्यामुळे चांगले रिटर्न्स मिळण्याची खात्री मिळते.
– एफडी किंवा आरडीपेक्षा चांगले रिटर्न्स जेष्ठ नागरिक बचत योजनेतून आपल्याला मिळते.
– टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो.
– दर तीन महिन्यांनी व्याजाची ठराविक रक्कम सुद्धा आपल्याला मिळते.
– बँकेबाबत किंवा पोस्ट ऑफिस मार्फत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | required documents for senior citizen Saving Scheme –
– वयाचा पुरावा
– पॅन कार्ड
– मतदार ओळखपत्र
– शिधापत्रिका
– ज्येष्ठ नागरिक कार्ड
– शाळेकडून जन्मतारीख प्रमाणपत्र
– एमसी/ग्रामपंचायत/जन्म आणि मृत्यू निबंधकांच्या जिल्हा कार्यालयाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
– पासपोर्ट
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी अर्ज | Application for senior citizen saving scheme –
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.
– या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी बँकेची किंवा पोस्ट ऑफिस सोबत संपर्क साधून या योजनेसाठी असणारा फॉर्म व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारे कागदपत्रे जोडून फॉर्म जमा करावा.
– अर्जदाराचे खाते ज्या बँकेमध्ये आहे ती बँक जर ही सुविधा देत असेल तर ऑनलाईन पद्धतीने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी फॉर्म भरता येऊ शकतो.