Site icon viral talk

Purse and bags manufacturing business | पर्स आणि बॅग बनवण्याचा व्यवसाय |Best profitable Business Ideas 2024

Purse and Bags manufacturing business

Purse and bags manufacturing business | पर्स आणि बॅग बनवण्याचा व्यवसाय –

       पर्स किंवा बॅग आपल्या दैनंदिन जीवनामधील एक महत्त्वाची वस्तू आहे असे आपण म्हणू शकतो, कारण आपण बाहेर निघालो तर लगेच सोबत पर्स किंवा बॅग घेतो. पर्स किंवा बॅग फक्त एक स्टाइल स्टेटमेंट म्हणून नव्हे तर बऱ्याच कामांसाठी किंवा काही शॉपिंग करायची असल्यास त्या उपयोगी ठरतात. इतर काही नाही तरी मोबाईल ,हात रुमाल आणि पैसे ठेवण्यासाठी नक्कीच पर्स किंवा बॅग कामी येतात. पर्स आणि बॅग बनवण्याचा व्यवसाय ( Purse and bags manufacturing business ) योग्य रीतीने केल्यास फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

Purse and bags manufacturing business | पर्स आणि बॅग बनवण्याचा व्यवसाय –

 १.व्यवसाय योजना तयार करा | Business planning for purse andbag manufacturing business –

– पर्स आणि बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी   व्यवसाय योजना तयार करणे गरजेचे आहे. 

-तुम्ही कोणत्या प्रकारच्या पर्स आणि बॅग बनवणार आहात?

 – पर्स किंवा बॅग बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरणार आहात ?

– हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात? 

– या व्यवसायासाठी कोणते रॉ मटेरियल लागेल?

–  या व्यवसायाला सुरू करण्यासाठी अंदाजे किती खर्च येऊ शकतो ?

– यांसारख्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय योजना तयार करा. 

२. पर्स किंवा बॅग बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते | Material used for making purse or bag –

 पर्स आणि बॅग विविध प्रकारच्या मटेरियल वापरून बनवले जाऊ शकतात,त्यापैकी तुम्ही कोणत्या मटेरियलचा वापर करून पर्स आणि बॅग बनवणार आहात ते ठरवा.

– कॉटन :

कॉटन बॅग देखील दिसायला खूप आकर्षक दिसतात आणि वापरण्यासाठी देखील खूप सोयीस्कर असतात.

– लेदर :

हॅन्डबॅग साठी लेदर हे चांगले मटेरियल आहे. लेदर मटेरियल टिकाऊ असते तसेच दिसायलाही आकर्षक असते. बोवाइन हे हँडबॅग बनवण्यासाठी वापरले जाणारे सर्वोत्तम लेदर आहे.

– कॅनव्हास :

कॅनव्हास हे एक अतिशय रेझिस्टंट फॅब्रिक आहे. कॅनव्हास हे फॅब्रिक बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय डिझायनर्सच्या आवडीचे बनले आहे. मोठ्या हँडबॅक बनवण्यासाठी हे फॅब्रिक योग्य आहे.

 – नायलॉन :

नायलॉन हे विविध प्रकारच्या पॉलिमर पासून बनवलेली कृत्रिम सामग्री आहे. नायलॉन पासून देखील हॅन्ड बॅग बनवल्या जातात. नायलॉन पासून बनवलेल्या बॅगला कधीही सुरकुत्या पडणार नाही.

तसेच डेनिम, मेष मटेरियल आणि स्ट्रॉ मटेरियल यांपासून देखील पर्स आणि हॅन्डबॅग बनवल्या जाऊ शकतात.

*कोणत्या मटेरियलच्या बॅग बनवणार आहात हे ठरवा आणि त्यासोबतच इतर आवश्यक रॉ मटेरियलची लिस्ट तयार करून होलसेल दराने ते सुद्धा खरेदी करा.

३.पर्स आणि बॅग बनवण्यासाठी लागणारे मशीन | Machine required for purse and bag manufacturing – 

-मार्केटमध्ये पर्स किंवा बॅग बनवण्यासाठी विविध प्रकारचे मशीन उपलब्ध आहेत. 

– सेमी ऑटोमॅटिक किंवा फुल्ली ऑटोमॅटिक मशीन असे मशीनचे प्रकार असतात. 

– तसेच वेगवेगळ्या मशीनची उत्पादन क्षमता देखील वेगवेगळी असते. 

– बऱ्याचदा मशीनच्या उत्पादन क्षमतेनुसार मशीनची किंमत देखील वेगवेगळी असते

– त्यामुळे तुम्हाला किती उत्पादन क्षमता पाहिजे ,तुम्ही कोणत्या मटेरियल पासून पर्स किंवा बॅग बनवणार आहात, तसेच तुमच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही मार्केट मधून योग्य ते मशीन खरेदी करू शकता.

४. पर्स आणि बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवाने  |Licence required for Purse and Bags manufacturing business:

– GST रजिस्ट्रेशन

– फर्म रजिस्ट्रेशन

– ट्रेड लायसेन्स

– आणि इतर आवश्यक

५ . पर्स किंवा बॅगची डिझाईन आणि किंमत ठरवा | Decide the design and price of purse or bag –

– तुम्ही बनवणार असणाऱ्या पर्स आणि बॅगच्या डिझाईन नुसार त्याचबरोबर आकारानुसार पर्स आणि बॅगची किंमत ठरवू शकता.

– त्याचबरोबर तुम्ही ज्या पर्स आणि बॅग बनवणार आहात त्या होलसेल दराने विकणार आहात की रिटेल दराने यानुसार सुद्धा पर्स आणि बॅगच्या किमतीमध्ये थोडाफार फरक आढळू शकतो.

६ . पर्स किंवा बॅगची मार्केटिंग कशी करावी | Marketing of purse and bags –

– तुम्ही ज्या पर्स आणि बॅग बनवणार आहात, त्या पर्स आणि बॅगचे एक कॅटलॉग तयार करू शकता. त्या कॅटलॉग मध्ये त्या पर्स आणि बॅगची डिझाईन ,किंमत आणि ती बॅग कोणत्या मटेरियल पासून बनलेली आहे यासारखी माहिती टाकू शकता.

– पर्स आणि बॅगच्या रिटेल स्टोअर्सला हे कॅटलॉग देऊन त्यांच्याकडून मोठ्या ऑर्डर्स मिळवू शकता.

– वेगवेगळ्या एक्झिबिशनच्या ठिकाणी सुद्धा पर्स आणि बॅगची चांगली विक्री होऊ शकते.

– पर्स आणि बॅगला customize करून देण्याचा ऑप्शन ठेवला तर सुद्धा विक्री अधिक प्रमाणामध्ये वाढू शकते.

– पर्स आणि बॅगची पॅकेजिंग सुद्धा व्यवस्थित ठेवा.

– तसेच ऑनलाईन सुद्धा विविध वेबसाईटवर तुम्ही पर्स आणि बॅग विकू शकता.

– तुम्ही स्वतःची देखील वेबसाईट तयार करून त्यावर देखील पर्स आणि बॅगची मार्केटिंग करू शकता.

– सोशल मीडिया मार्केटिंग करून सुद्धा पर्स आणि बॅगची चांगली विक्री करता येऊ शकते.

    अशाप्रकारे पर्स आणि बॅग मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा व्यवसाय ( Purse and Bag manufacturing business) सुरू करता येऊ शकतो.

Business funding options

⭕व्यवसायासाठी आर्थिक पर्याय

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/finance-options-for-business/

⭕ टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय

⭕जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/tomato-sauce-making-business/

Exit mobile version