पोहे बनवण्याचा व्यवसाय | Poha making business | Best Business ideas 2024 –

पोहे बनवण्याचा व्यवसाय | Poha making business | Best Business ideas 2024 –

      आपल्या राज्यामध्ये जास्त करून “पोहे” हा नाष्टा बनवला जातो. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा लोकं पोहे खाणे पसंत करतात.पोहे हे पचायला सोपे,खाण्यास योग्य आणि पौष्टिक असतात,त्यामुळे बरेचसे लोक पोहे खाणे पसंत करतात.पोह्यांची मागणी सतत असतेच, त्यामुळे पोहे बनवण्याचा व्यवसाय ( Poha making business ) करणे फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

Poha Making business

– पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्ही व्यवसाय योजना बनवणे गरजेचे आहे त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो :

– हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहोत ?

– या व्यवसायासाठी किती जागा लागेल ?

– या व्यवसायासाठी कोणत्या मशीनरी लागतील ?

– कोणता कच्चा माल लागेल ?

–  तसेच पोहे बनवण्याच्या व्यवसायासाठी कोणते लायसन्स लागतील ?

– अंदाजे किती गुंतवणुकीची आवश्यकता असेल ?

या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवसाय योजना तयार करा.

– पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जागा असेल तर उत्तमच परंतु तसे नसल्यास हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा भाड्याने घेऊ शकता.

– पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे कमीत कमी ५०० स्क्वेअर फूट जागा आवश्यक आहे.

– पोहे तयार करण्यासाठी मुख्य कच्चा माल तांदूळ आहे. तांदळाची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून किंवा होलसेल दराने करू शकता.

– चांगल्या गुणवत्तेचे पोहे बनवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या तांदळाचा उपयोग करा.

– पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मशीनची आवश्यकता असेल.

– पोहे बनवण्याचे मशीन अंदाजे एक ते दोन लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.

– परंतु पोह्याची गुणवत्ता तसेच इतर काही फॅक्टर्स वर सुद्धा पोहे बनवण्याच्या मशीनची किंमत अवलंबून असते.

– मार्केटमध्ये पोहे बनवण्याच्या मशीनची माहिती घेऊन आपल्या गुंतवणुकीनुसार योग्य त्या मशीनची खरेदी करावी.

– GST रजिस्ट्रेशन 

– FSSAI (food safety and standards authority of India) 

पोहे हे खाद्यपदार्थांअंतर्गत येत असल्याने FSSAI हे लायसन्स हे गरजेचे आहे.हे लायसन्स असल्यामुळे ग्राहकांना उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल अधिक विश्वास निर्माण होतो.

– स्थानिक प्राधिकरणाकडून/लोकल अथॉरिटी कडून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी घेणे आवश्यक आहे .

– व्यापार परवाना

– एमएसएमई नोंदणी

– पोहे बनवण्याच्या व्यवसायासाठी अंदाजे आठ लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो यामध्ये जागेचा खर्च, मशीनचा खर्च, कच्च्या मालाचा खर्च, कामगारांचा पगार तसेच पाणी आणि वीज यांचा खर्च असा समावेश होतो.

– पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मुद्रा लोन काढू शकता.

✅ प्रधानमंत्री मुद्रा लोन 

✅ Pradhanmantri Mudra Loan 

✅ नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आहे तो व्यवसाय वाढवायचा असेल, पण भांडवल नाहीये,कर्ज मिळत नाहीये तर नक्की बघा ही योजना तुमच्या साठीच आहे….

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

– तुम्ही बनवत असलेल्या पोह्यांना काहीतरी पोह्याशी निगडित असे आकर्षक ब्रँड नेम द्या. 

– सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत वापरून चांगली मार्केटिंग करता येऊ शकते.

– पोह्यांची विक्री करण्यासाठी तुम्हाला मिळणारे कस्टमर म्हणजे किराणा दुकाने ,सुपरमार्केट,मॉल्स,हॉटेल्स,रेस्टॉरंट्स इत्यादी. या सर्व ठिकाणी विजीट करून तुम्ही यांच्याकडून मोठ्या ऑर्डर्स मिळवू शकतात.

– तुम्ही बनवत असलेल्या पोह्यांची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे तसेच लोकल चॅनल्स आणि एफ एम रेडिओ यांची मदत घेऊ शकता.

– तसेच तुम्ही बनवत असलेल्या पोह्यांबद्दलची  माहिती असणारे पॅम्प्लेट छापून ते देखील वाटू शकता.

– पोहे ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने देखील विकता येऊ शकतात. आज काल बहुतेक साऱ्या वेबसाईट उपलब्ध आहे त्यावर पोह्यांची विक्री केली जाऊ शकते.

      अशा पद्धतीने पोहे तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आणि त्यामध्ये यश मिळवू शकता.

⭕ Electric two wheeler franchises 

⭕ जाणून घ्या अधिक माहिती..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕ CGTMSE scheme 

⭕ क्रेडिट गॅरंटी स्कीम

⭕ मिळवा व्यवसायासाठी कर्ज, जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/cgtmse-scheme/

Leave a Comment