Site icon viral talk

चांगला परतावा देणारी पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना |  National Saving Certificate (NSC) Scheme | Best investment and saving opportunity 2024

National Saving Certificate ( NSC) scheme

चांगला परतावा देणारी पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना |  National Saving Certificate (NSC) Scheme –

       भारत सरकार तर्फे किंवा पोस्ट ऑफिस मार्फत लोकांना बचत करता येण्यासाठी किंवा बचतीची सवय व्हावी, भविष्यामध्ये केलेली बचत किंवा गुंतवणूक उपयोगी यावी, केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा यासाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ( National Saving Certificate (NSC) Scheme ) सुरू केलेली आहे. या योजनेबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत…

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना | National Saving Certificate (NSC) Scheme –

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही पोस्ट ऑफिस मार्फत सुरू करण्यात येणाऱ्या सर्वोत्तम योजनेपैकी एक योजना आहे.

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक १००० रुपये परंतु गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही,१०० च्या पटीत कितीही.

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याज दर 7.7% p.a आहे. या योजनेसाठी कंपाउंड इंटरेस्ट असल्याकारणाने ही योजना अधिक फायदेशीर ठरते. 

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी गुंतवणूक केल्यानंतर त्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युअर होईल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी खात्याचे प्रकार | National Saving Certificate (NSC) Scheme account types –

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत अकाउंट दोन प्रकारांमध्ये येतात:

१. सिंगल अकाउंट – या अकाउंट मध्ये एकच व्यक्ती खातेधारक असते.

२. जॉईंट अकाउंट – या अकाउंट मध्ये एकापेक्षा अधिक अकाउंट होल्डर्स असतात.

जॉईंट अकाउंट चे पुन्हा दोन प्रकार पडतात जॉईंट ” ए “आणि जॉईंट ” बी “. यापैकी एका प्रकारामध्ये जेवढे अकाउंट होल्डर्स असतात त्यांना परतावा समप्रमाणामध्ये विभागला जातो तर दुसऱ्या प्रकारांमध्ये जेवढे अकाउंट होल्डर्स असतील त्यापैकी एकाच्या अकाउंटवर परतावा दिला जातो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना पात्रता | National Saving Certificate (NSC) Scheme Eligibility –

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त भारतीय व्यक्ती पात्र आहे.

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही.

– हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्या , ट्रस्ट नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत. 

– अनिवासी भारतीय म्हणजेच (NRI) नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम वैशिष्ट्ये | features of national saving certificate scheme – 

– सध्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम गुंतवणूकदारांसाठी 7.7% दराने हमी परतावा देते, या स्कीम द्वारे दिलेला परतावा साधारणपणे FD पेक्षा जास्त असतो.

– नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम सरकारद्वारे समर्थित असल्याने प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C च्या तरतुदींनुसार रु. 1.5 लाखांपर्यंत दावा करू शकता.

– कमीत कमी हजार रुपये आणि जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता.

– नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीमचा फायदा घेण्यासाठी कुठल्याही पोस्ट ऑफिस द्वारे अर्ज करू शकता आणि या योजनेसाठी “ट्रान्सफर” फीचर सुद्धा आहे. 

– बँका आणि NBFC सुरक्षित कर्जासाठी कोलेटरल किंवा सिक्युरिटी म्हणून NSC स्वीकारतात, यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस मधून प्रमाणपत्रावर ट्रान्सफर स्टॅम्प लावून ते बँकेत ट्रान्स्फर करावे.

– नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम साठी कंपाउंड इंटरेस्ट असल्याकारणाने जो इंटरेस्ट पहिल्या वर्षी येतो तो आपोआपच पुढच्या वर्षी गुंतवला जातो म्हणजेच टोटल रकमेवर पुन्हा इंटरेस्ट आपल्याला मिळतो.

– मॅच्युरिटी झाल्यावर संपूर्ण मॅच्युरिटी व्हॅल्यू मिळते. NSC पेआउट्सवर TDS नाही, ग्राहकाने त्यावर लागू असलेला कर मात्र भरावा.

– Premature withdrawal: शक्यतो मुदतीपूर्वी या योजनेअंतर्गत बाहेर पडू नये असे केल्याने फायदा कमी मिळतो परंतु जर गुंतवणुकदाराच्या मृत्यूसारख्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये किंवा त्यासाठी न्यायालयाचा आदेश असल्यास ते या योजनेतून आपण बाहेर पडू शकतो.

जर एक वर्षाच्या आत या योजने मधून बाहेर पडलो तर आपल्याला व्याज मिळत नाही, जर एक ते दोन वर्षात या योजनेतून बाहेर पडलो तर सेविंग अकाउंटला जेवढा व्याजदर असतो तेवढे व्याज मिळते आणि जर तीन ते चार वर्षात या योजनेतून बाहेर पडलो तर या योजनेसाठी असणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्के कमी व्याजदर आपल्याला मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना आवश्यक कागदपत्रे | Necessary Documents for National Saving Certificate (NSC) Scheme  –

– पासपोर्ट साईज फोटो

– ओळखीचा पुरावा : पासपोर्ट किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतीही अधिकृत सरकारी ओळख पत्र 

– पत्त्याचा पुरावा जसे की वीज बिल किंवा बँक स्टेटमेंट किंवा इतर .

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज| Application for National Saving Certificate (NSC) Scheme  –

– नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम साठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

– ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास Department of Posts (DOP) net banking ओपन करून लॉगिन करून पुढील प्रोसिजर करावी.

– ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजने संदर्भातील सर्व माहिती घ्यावी तसेच या योजनेसाठी लागणारा अर्ज तिथून मिळवावा, त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावी.

– आपला अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते, आपल्याला गुंतवणूक करावयाची रक्कम जमा करावी आणि NSC मिळवावे.

Calculations : 

गुंतवणूक (रू.)100050,0001,00,00050,00,000
पाच वर्षानंतर मिळणारे व्याज (रू.)44922,45244,90322,45,169
मिळणारी एकूण रक्कम (रू.)144972,4521,44,90372,45,169

⭕ सरकारतर्फे नव्या योजनेची घोषणा..
⭕ जाणून घ्या नक्की योजना काय आहे..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/mukhyamantri-vayoshree-yojana/

Exit mobile version