e rickshaw yojana | अपंगांना मोफत ई रिक्षा | ई रिक्षा योजना | Best Government schemes 2024

e rickshaw yojana | अपंगांना मोफत ई रिक्षा..

       दिव्यांग व्यक्तींसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजेच ई-रिक्षा योजना (  e rickshaw yojana ) आहे. कारण ई रिक्षा योजनेमुळे राज्य सरकारतर्फे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी इलेक्ट्रिक तीन चाकी गाडी मिळणार आहे जिचा उपयोग मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल ( गाडीमध्ये फिरते दुकान ) सुरू करण्यासाठी होईल. दिव्यांग व्यक्तींना फिरता व्यवसाय सुरू करता आल्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये नक्कीच मदत होईल. जाणून घेऊयात ई रिक्षा योजनेबद्दल अधिक माहिती….

E rickshaw Yojana

– ई रिक्षा योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना असून महाराष्ट राज्य दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत येते.

– ई रिक्षा योजनेचे लाभार्थी राज्यांमधील दिव्यांग व्यक्ती आहेत.

– दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणे हा ई रिक्षा योजनेचा उद्देश आहे.

– दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करता यावा आणि आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी सुद्धा मदत व्हावी यासाठी ई रिक्षा योजना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

– तसेच सर्वसामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे जीवन जगते तसाच अनुभव दिव्यांग व्यक्तींना सुद्धा स्वतः काहीतरी केल्यामुळे मिळणार आहे, तसेच ते सुद्धा कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात हे समाधान सुद्धा नक्कीच त्यांना मिळणार आहे.

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेसाठी अटी व शर्ती | Terms and conditions for E rikshaw Yojana –

– या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.

– अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण कमीत कमी 40 टक्के असणे गरजेचे आहे आणि जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक आहे.

– दिव्यांगत्वाचे यु.डी.आय.डी प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे बंधनकारक आहे.

– अर्जदार दिनांक 01 जानेवारी 2024 या अहर्ता तारखेच्या दिवशी 18 ते 55 या वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे.

– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

– अर्जदार मतिमंद असल्यास अर्जदाराचे कायदेशीर पालक अर्ज करण्यासाठी सक्षम असतील.

– निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने असेल म्हणजेच जास्त अपंगत्व असलेल्या अर्जदारास प्राधान्य दिले जाईल.

– परवानाधारक नसलेल्या परंतु अति तीव्र दिव्यांग व्यक्तीला सोबतीच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करता यावा यासाठी प्राधान्य दिले जाईल.

– अर्ज करणारी व्यक्ती शासकीय किंवा निम शासकीय मंडळे किंवा महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.

– अर्जदार दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असल्यास थकबाकीदार नसावा.

– अर्ज करतेवेळी अर्जदारास सर्व अटी मान्य असल्याचे व संबंधित वाहनाची व्यवस्थित काळजी घेणे असे बंध पत्र सादर करणे अर्जदारास आवश्यक आहे.

– अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल.

– जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा ही दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.

दिव्यांग इ रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for e rikshaw Yojana –

– फोटो

– जातीचा दाखला

– रहिवासी पुरावा

– अधिवास प्रमाणपत्र ( डोमिसाइल )

– दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र

– यु. डी. आय. डी प्रमाणपत्र

– ओळखपत्र

– बँक पासबुक 

– अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र

दिव्यांग ई रिक्षा योजनेसाठी अर्ज | Application for e rickshaw yojana –

– सूचना व्यवस्थित वाचाव्यात.

– वापरकर्त्याची नोंदणी करावी.

– पोर्टल वरती लॉग इन करावे.

– अर्ज व्यवस्थित रित्या भरावा आणि त्यासोबत लागणारी कागदपत्रे अपलोड करावीत.

– फॉर्म पुन्हा एकदा तपासून घ्यावा आणि फॉर्म सबमिट करावा.

– अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिट केला आहे अशी सबमिशनची पोहोच पावती मिळेल ,ती पोहोच पावती जपून ठेवावी.

ई रिक्षा योजनेसंदर्भातील शासन निर्णय ( GR ) – या योजने संदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट :

https://evehicleform.mshfdc.co.in/

स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

मातृ वंदना योजना..👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/pradhanmantri-matru-vandana-yojana/

Leave a Comment