चपाती/पोळी बनवण्याचा व्यवसाय | Chapati making business | Best Business Ideas 2024

चपाती/पोळी बनवण्याचा व्यवसाय | Chapati making business | Best Business Ideas 2024

      आपल्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. चपाती किंवा पोळी आपल्या जेवणामध्ये आपण आवर्जून खातोच. लग्नामध्ये किंवा इतर मोठ्या सोहळ्यामध्ये चपाती जास्त प्रमाणामध्ये लागते. अशा ठिकाणी तुम्ही चपाती बनवून देऊन केटरिंग सर्विसेस सुरू करू शकता किंवा मेस साठी, होस्टेल साठी किंवा खानावळीमध्ये सुद्धा चपाती बनवून देऊ शकता. हा व्यवसाय जर योग्य रीतीने केला तर चांगल्या रीतीने चालू शकतो आणि कमाई सुद्धा व्यवस्थित होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात चपाती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा…

Chapati making business

– चपाती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करा. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो.

– हा व्यवसाय कोठे सुरू करणार आहात?

– या व्यवसायासाठी गुंतवणूक किती करणार आहात ?

– या व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल ?

– या व्यवसायासाठी कोणते मशीन लागतात ?

– या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवाने ?

– चपाती बनवण्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी ?

यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश चपाती बनवण्याच्या व्यवसायामध्ये होऊ शकतो. थोडक्यात, या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा विचार करून व्यवसाय योजना तयार करा.

– जर छोट्या स्तरावर किंवा कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगदी आपल्या स्वतःच्या घरामधून सुद्धा हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

– परंतु जास्त गुंतवणूक करण्याची तयारी असेल आणि व्यवसायाची व्यापकता वाढवायची असेल तर या व्यवसायासाठी मशीनची आवश्यकता लागेल आणि त्यासाठी पुरेशी जागा सुद्धा लागेल ,त्यानुसार जागेची निवड तुम्ही करू शकता.

– चपाती बनवण्याच्या व्यवसायासाठी मुख्य कच्चा माल गव्हाचे पीठ,मीठ, पाणी,तेल आहे.

– यासोबतच छोट्या गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करत असाल तर अगदी घरगुती साहित्य म्हणजे पोळपाट लाटणे, तवा, गॅस… यांसारख्या आवश्यक वस्तू लागतील त्याची यादी बनवून तुम्ही त्या वस्तू घेऊ शकता किंवा घरामधूनच व्यवसाय सुरू करणार असाल तर या वस्तू आपल्या घरात उपलब्ध असतातच.

– परंतु जर जास्त गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यासाठी चपाती बनवण्याचे यंत्र खरेदी करू शकता. चपाती बनवण्याचे यंत्राचे पुढील प्रकार येतात. आपण किती गुंतवणूक करणार आहात त्यानुसार चपाती बनवण्याचे यंत्र खरेदी करू शकता.

– मॅन्युअल चपाती मेकिंग मशीन 

– सेमी ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन 

– फुल्ली ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन 

– तसेच चपाती वेगवेगळ्या ठिकाणी पुरवण्यासाठी त्यांची पॅकिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे त्यासाठी आवश्यक पॅकेजिंग मटेरियल खरेदी करा.

– चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठ आवश्यक असते तर आपण होलसेल दराने गहू खरेदी करू शकता किंवा थेट शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करू शकता यामुळे प्रॉफिट मार्जिन जरा जास्त मिळू शकेल.

– नेहमी आपल्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली राखा.

– जीएसटी रजिस्ट्रेशन

– SSI नोंदणी / उद्योग आधार

– नगरपालिका परवाना 

– FSSAI Licence

– इतर आवश्यक परवाने (आवश्यक असल्यास )

– सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत वापरून चांगली मार्केटिंग करता येऊ शकते.

– त्यासोबतच आपले जे ग्राहक तयार होतात त्यांना आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी आवडली तर आपोआपच ते ग्राहक इतर ग्राहकांना सांगतात म्हणजेच माऊथ पब्लिसिटी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची असते.

– मेस, केटरिंग सर्विसेस, बँक्वेट हॉल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात.

– पॅम्प्लेटस् छापून ठिकठिकाणी वाटू शकता.

– चपातीची गुणवत्ता नेहमी चांगली ठेवून योग्य त्या दरामध्ये चपातीची विक्री करा जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक मिळतील.

– चपातीची पॅकेजिंग सुद्धा चांगली ठेवा जेणेकरून चपाती ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत व्यवस्थित राहील, या काही गोष्टींचे पालन केल्यामुळे आपोआपच ग्राहकांची संख्या वाढते.

    अशा रीतीने चपाती बनवण्याचा व्यवसाय ( Chapati Making business) सुरू करू शकता.

घरकुलासाठी अडीच लाखांचे अनुदान…
जाणून घ्या या योजनेबद्दल अधिक माहिती…
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/shabari-gharkul-yojana/#google_vignette

⭕ 5 Best Agriculture business ideas 

⭕ शेती विषयक व्यवसाय कल्पना

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment