Money Saving tips | आर्थिक बचत करण्यासाठी काही टिप्स | दर महिन्याला आपल्या सॅलरीमधून पैशाची बचत कशी करावी | Best tips 2024 –

Money Saving tips

Money Saving tips | आर्थिक बचत करण्यासाठी काही टिप्स | दर महिन्याला आपल्या सॅलरीमधून पैशाची बचत कशी करावी | Best tips –     आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे कारण आपल्या मूलभूत गरजा तसेच इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा पगार असतो किंवा वेगवेगळे उत्पन्न मिळत असते परंतु … Read more

Monthly Income Scheme 2024 | 10,000 रुपये दर महा उत्पन्न मिळवा | Best income Schemes 2024 –

Monthly Income Scheme 2024

Monthly Income Scheme 2024 |10,000 रुपये दर महा उत्पन्न मिळवा| Best income Schemes 2024 –     आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा ( Monthly Income Scheme 2024 ) योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला महिन्याला इन्कम मिळू शकते. किती इन्वेस्टमेंट केल्यावर किती रक्कम मिळेल तसेच यामध्ये रिस्क किती आहे या सर्व गोष्टींबद्दल आजच्या … Read more

Medley Pharma Scholarship | दहावी पास पासुन पुढे सर्वांसाठी स्कॉलरशिप | Best Scholarships 2024 –

Medley Pharma Scholarship

Medley Pharma Scholarship | दहावी पास पासुन पुढे सर्वांसाठी स्कॉलरशिप | Best Scholarships 2024 –      आजच्या ब्लॉगमध्ये आपण Medley Pharma Scholarship ( मेडले फार्मास्युटिकल्स स्कॉलरशिप ) या स्कॉलरशिप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही स्कॉलरशिप दहावी पास सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नसते परंतु … Read more

Government Investment Schemes with Low Risk and High Returns | 5 सरकारी गुंतवणूक योजना | 5 Government Investment schemes-

Government investment schemes

Government Investment Schemes with Low Risk and High Returns | 5 सरकारी गुंतवणूक योजना | 5 Government Investment schemes-       इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे करायची असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट साठी जे मार्ग सोयीस्कर वाटतात ते मार्ग ते स्वीकारतात परंतु एखाद्या व्यक्तीला सोयीस्कर वाटणारा गुंतवणुकीचा मार्ग दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा बरोबर वाटेलच असे … Read more

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची चांगली योजना I Senior Citizen Saving Scheme I Best Government Schemes 2024

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना –     केंद्र सरकार तर्फे आणि राज्य सरकार तर्फे महिलांसाठी इतर नागरिकांसाठी, लहानग्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा विविध योजना सुरू केल्या जातात. आजच्या लेखामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या एका योजनेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ती योजना आहे ,ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( Senior Citizen … Read more

राज्यांमधील या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये | Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 I Best Government Schemes 2024

Sanman Dhan Yoajana

राज्यांमधील या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये | Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना –         राज्यामधील नोंदणीकृत घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा अंतर्गत सन्मान धन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.सन्मान धन योजना (Sanman Dhan Yojana) या योजनेअंतर्गत घरेलू कामगारांना दर वर्षी दहा हजार रुपये दिले जाणार … Read more

आता मिळू शकतात दर महिन्याला 9250 रुपये,जाणून घ्या नक्की योजना काय आहे| Post Office Monthly Income Scheme in marathi | Best Post office schemes 2024 –

आता मिळू शकतात दर महिन्याला 9250 रुपये,जाणून घ्या नक्की योजना काय आहे| Post Office Monthly Income Scheme in marathi | Best Post office schemes 2024 –       आपण आर्थिक दृष्ट्या सेक्युर व्हावं, असे प्रत्येकालाच वाटते म्हणूनच तर विविध योजनांमध्ये आपण गुंतवणूक करत असतो. पोस्ट ऑफिस मार्फत सुद्धा विविध योजना राबवल्या जातात, आज आपण … Read more

Budget 2024 |  अर्थमंत्री नक्की काय म्हणाल्या…? | आर्थिक बजेट | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman Budget 2024 –

Budget 2024 |  अर्थमंत्री नक्की काय म्हणाल्या…? | आर्थिक बजेट | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman Budget 2024 –         गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प होता.निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला ( Budget 2024 ) संसदेमधील इतर सदस्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

व्यवसाय करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज |Government Loan schemes for Businesses | 4 Good Government Loan Schemes

व्यवसाय करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज |Government Loan schemes for Businesses  –      आपल्या देशामध्ये विविध बरेचसे व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडे शिक्षण आहे परंतु नोकरी नाही, किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे परंतु शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही असे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत परंतु बऱ्याच व्यक्तींना काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते त्यासाठी … Read more

२०२४ मध्ये आर्थिक बचत कशी कराल | Financial Tips in Marathi| Best finance tips | Money Saving tips –

Finance tips
२०२४ मध्ये आर्थिक बचत कशी कराल | Financial Tips in Marathi| Best finance tips | Money Saving tips 
    सध्या आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याकडे पुरेसे पैसे असणे म्हणजेच आपण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असणे खूप गरजेचे आहे. आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात तसेच विविध प्रकारचे विमा सुद्धा काढतात. आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण सहा सोप्या टिप्स बघणार आहोत.

Best Financial tips | आर्थिक बचत कशी कराल ?

Finance tips

1.  सहा महिने जेवढा खर्च येतो तेवढ्या पैशाचा एक इमर्जन्सी फंड बनवा | emergency fund –

आपला महिन्याचा जो काही खर्च असतो उदाहरणार्थ किराणा ,भाजीपाला, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घर किंवा गाडीचे हप्ते किंवा इतर खर्च या सर्व खर्चांचा हिशोब करून सहा महिने किती खर्च येऊ शकतो हा अंदाज घेऊन तेवढ्या अमाऊंटचा इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे असे केल्यामुळे आपण करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये अचानकपणे काही अडचण आली तर इतर नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला किमान सहा महिन्यांचा कालावधी तरी मिळेल आणि आपण अशा रीतीने आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होऊ.
 

2. आपल्या दर महिन्याच्या कमाई मधून कमीत कमी 20 टक्के रक्कम सेव करा | Monthly saving –

    आपली महिन्याला जी काही कमाई असेल त्या कमाई मधून कमीत कमी 20 टक्के रक्कम आपण बचत केली पाहिजे. या बचत केलेल्या रकमेचा उपयोग भविष्यामध्ये आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यामध्ये नक्की होईल.

3.  अधिक इन्कम सोर्स बनवा | Income source –

    बरेच लोक एकाच इनकम सोर्स वर अवलंबून राहता परंतु काही अडचण किंवा अचानकपणे इतर काही प्रॉब्लेम आला तर अशावेळी मात्र आपल्या उत्पन्नाचा स्रोत आपल्याकडे नसेल तर आपल्यापुढे फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि म्हणूनच आपण नोकरी करत असो वा व्यवसाय परंतु एका व्यतिरिक्त आपल्याकडे जास्तीत जास्त इन्कम सोर्स असावेत.
    उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर कोरोना काळामध्ये बहुतेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या परंतु जे लोक पूर्णपणे नोकरीवर अवलंबून होते त्यांना आर्थिक सपोर्ट नव्हता परंतु ज्या लोकांना शेती होती किंवा जे लोक नोकरी बरोबरच इतर छोटासा व्यवसाय करत होते किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्निंग करत होते अशा लोकांना कोरोनाचा फारसा फटका बसला नाही.
   म्हणूनच आपण सुद्धा कमाईचे जास्तीत जास्त स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे.

4 . फायनान्स संदर्भात ज्ञान मिळवा | Finance knowledge – 

    आर्थिक बचत करावी हे प्रत्येकालाच वाटते परंतु आर्थिक बचत नेमकी कशी करावी याबद्दल व्यवस्थित रित्या ज्ञान मिळत नाही परंतु जर आपण फायनान्स संदर्भामध्ये पुस्तके वाचली तर आपल्याला नक्कीच त्याबद्दल पुरेसे ज्ञान मिळू शकते. पुस्तके वाचण्याबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा विविध प्लॅटफॉर्मवर फायनान्स संदर्भात ज्ञान आपल्याला नक्कीच मिळू शकते.

5 . जर गरज नसेल तर कर्ज घेऊ नका –

काही लोकांना सवय असते की जी गोष्ट अति गरजेची नाही ती सुद्धा खरेदी करतात परंतु ती वस्तू खरेदी करताना आपल्या आर्थिक बजेट विचारात घेत नाहीत आणि नंतर त्या वस्तूची किंमत चुकवण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ येते
मग हे कर्ज भरत असताना जर अडचणी येऊ लागल्या तर मात्र प्रॉब्लेम होतो. परंतु ज्या वस्तू किंवा गोष्टी आपल्या गरजेच्या नसतील आणि जर त्या वस्तू महागड्या असतील तर नक्कीच अशा वस्तू घेणे टाळावे.

6 . जोपर्यंत संपत्ती तयार होत नाही तोपर्यंत आपल्या  हौसेच्या वस्तू खरेदी करू नका – 

काही लोक ज्या वस्तू गरजेच्या नाहीत त्या वस्तू हौस म्हणून खरेदी करतात परंतु आपण जर आर्थिक दृष्ट्या सक्षम नसू तर असे करणे टाळावे.हौस पूर्ण करणे किंवा आपल्या आवडीच्या वस्तू घेणे यामध्ये काही गैर नाही परंतु त्यासाठी आपण सर्वप्रथम आर्थिक दृष्ट्या मजबूत होणे गरजेचे आहे.
     अशाप्रकारे या फायनान्स टिप्स नक्कीच आपल्या उपयोगात येणाऱ्या आहेत आणि पैशांमध्ये बचत करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत.

Read more