Site icon viral talk

Boycott Maldives का आहे ट्रेंड मध्ये ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंड मागचं नेमकं कारण काय?

Boycott Maldives

    सध्या Boycott Maldives हा हॅशटॅग खूप ट्रेंड होत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीप दौरा करून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी रोजी त्यांच्या २ दिवसीय दौऱ्यामधील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर सुद्धा केले आहेत. ‘लँड ऑफ कोरल्स’लक्षद्वीप या ठिकाणी अगदी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती.

Boycott Maldives का आहे ट्रेंड मध्ये ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंड मागचं नेमकं कारण काय?

    फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेत असताना त्याच बरोबर स्नॉर्कलिंग करताना तसेच वाळूवर चालताना असे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले. या पोस्ट खाली बऱ्याच कमेंट झाल्या. काहींनी तर लक्षद्वीप या ठिकाणी जायला हवं अशा सुद्धा पोस्ट केल्या आणि काहींनी लक्षद्वीप आणि मालदीव यांची तुलना करण्यास सुद्धा सुरुवात केली. लक्षदीप ट्रेंड होण्यास सुद्धा सुरुवात झाली.

     बरेचसे सेलिब्रिटी तसेच इतर लोक सुद्धा सुट्टीसाठी मालदीवला जाण्यास पसंती देतात, मालदीवला खूप प्रसिद्धी सुद्धा मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भारतात गुगल वर सर्वाधिक शोधला जाणारा दहावा शब्द “लक्षद्वीप” बनला आहे.

       भारतीय बेटाची चर्चा आता सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे ही चर्चा आणि लोकप्रियता मालदीव येथील एका खासदाराला मात्र पटली नाही त्या खासदाराचे नाव आहे जाहीर रमीझ. जाहीर रमीझ यांनी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली,”लक्षद्वीपचे पर्यटन तुम्हाला वाढवायचे असेल,पण ही भ्रामक कल्पना आहे. आम्ही ज्या प्रकारे सर्विस पुरवितो, त्या प्रकारची सर्विस लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता राखू शकतात का? हॉटेलच्या खोल्यामध्ये एकप्रकारचा वास येतो, त्याचे काय करणार?”. अशा वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारतीय युजरने सुद्धा मालदीवच्या या व्यक्तीला चांगलाच रिप्लाय दिला.

    मालदीवच्या मंत्री मरियम शिऊना ( Mariyam Shiuna) यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टवर रिप्लाय देऊन टीका केली होती परंतु कालांतराने मरियम शिऊनानी त्यांची पोस्ट डिलीट केली. परंतु मालदीवला भारतीय लष्कराची गरज नाही असे म्हटल्यामुळे वाद वाढला. मालदीवच्या इतर काही मंत्र्यांनी सुद्धा असे काही ट्विट केले आणि त्यांना आपल्या भारतीय युजर्सने सुद्धा चांगलाच रिप्लाय देण्यास सुरुवात केली आणि तिथूनच #BoycottMaldives Trend सुरू झाला.

      सचिन तेंडुलकर ,सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या भारतीय सेलिब्रिटींनी सुद्धा भारतीय बेटांना आणि समुद्रकिनाऱ्यांना भेट द्या असे ट्विट केले.

    मालदीव मधील काही मंत्र्यांनी जरी असे निगेटिव्ह ट्विट केले असले तरी मालदीव मधीलच इतर काही मंत्र्यांनी त्याचे समर्थन केले नाही. तर काहींनी तर भारताची अधिकृत रित्या माफी मागावी असे सुद्धा मालदीव सरकारला सुचवले.#BoycottMaldives चा परिणाम बघायला मिळाला तो असा की बऱ्याच लोकांनी मालदीवचे बुकिंग कॅन्सल केले असल्याचे शेअर केले आणि त्यासोबत तसे स्क्रीन शॉट सुद्धा शेअर केले आणि यापुढे मालदीवला जाणार नाही असे सुद्धा पोस्ट केले. तर काही अशा सुद्धा बातम्या आल्या की काही कंपन्यांनी मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आणि लक्षद्वीपला जाण्यासाठी काही ऑफर्स सुद्धा ठेवल्या. अशा सुद्धा बातम्या आल्या की बऱ्याच भारतीयांनी मालदीवला जाणार नाही अशा पोस्ट केल्या.

    मालदीव मध्ये जाणाऱ्या पर्यटकांची सर्वात जास्त संख्या भारतीयांची आहे. त्यामुळे पुढे आता मालदीव वर नेमकी काय परिणाम होईल हे दिसून येईल आणि भारतीय बेट, लक्षद्वीप आणि इतर समुद्रकिनारी पर्यटन स्थळे यांच्यावर सुद्धा कशा रीतीने लक्ष केंद्रित केले जाईल हे सुद्धा दिसून येऊ शकते.

⭕ Makar Sankranti special business ideas ⭕ मकर संक्रांत स्पेशल बिझनेस आयडियाज👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://iconikmarathi.com/makar-sankranti-special-business-idea/

⭕Winter skin care⭕ हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी ?⭕Home remedies for dry skin..👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://www.viral-talk.in/winter-skin-care/?amp=1

Exit mobile version