महिलांना मिळणार 25 लाख रुपये कर्ज…| SBI Stree Shakti Package Yojana –
बऱ्याचशा महिलांना स्वतःचे काहीतरी सुरू करायचे असते, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु अडचण येते ती भांडवलाची… परंतु आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे विविध योजनांमार्फत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यासाठी कर्ज किंवा आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. आज अशाच एका योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत ती योजना आहे…एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजना ( SBI Stree Shakti Package Yojana ).
Table of Contents
एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजना | SBI Stree Shakti Package Yojana –
– ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एसबीआय स्त्री शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
– एसबीआय स्त्री शक्ती योजनेमुळे महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यामध्ये मदत होईल व या योजनेचा हातभार सामाजिक तसेच आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये सुद्धा होईल.
– एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा सध्या असणारा व्यवसाय वाढवायचा आहे,अशा महिलांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
– एसबीआय स्त्री शक्ती योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत कर्ज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची हमी देण्याची आवश्यकता नाही.
– ज्या महिला स्वतः उद्योजक आहेत किंवा खाजगी लिमिटेड कंपनीच्या भागीदार/भागधारक/संचालक किंवा सहकारी संस्थेच्या सदस्या म्हणून 51% पेक्षा कमी शेअर भांडवल नाही अशा महिला एसबीआय स्त्री शक्ती योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
– एसबीआय स्त्री शक्ती योजनेचा (SBI Stree Shakti package yojana )लाभ घेण्यासाठी महिलेची व्यवसायामध्ये किमान 50 टक्के मालकी असणे आवश्यक आहे,हा महत्त्वाचा पात्रता निकष आहे.
एसबीआय स्त्री शक्ती कर्ज योजना अंतर्गत कर्जाची रक्कम | loan amount under SBI Stree Shakti package scheme –
अर्जदाराला त्याची प्रोफाइल आणि मार्गदर्शक तत्वे याच्या आधारावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
किरकोळ व्यापारी: रु. 50000 ते रु. 2 लाख
व्यवसाय उपक्रम: रु. 50000 ते रु. 2 लाख
व्यावसायिक: रु. 50000 ते 25 लाख रुपये
SSI: रु. रु. 50000 ते रु. 25 लाख
– महिलांना हे कर्ज विविध श्रेणींमध्ये लागू असल्यास मार्जिन 5% वरून कमी करता येईल.
– समजा एखाद्या महिलेने एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज या योजनेंतर्गत 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज घेतले तर त्यासाठी महिलेला 0.5% कमी व्याज द्यावे लागेल.
– 5 लाख रुपये व्यवसाय कर्जाची रक्कम असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही.
– एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज ( SBI Stree Shakti package yojana) या योजनेअंतर्गत खेळते भांडवल सुविधेसाठी सवलतीच्या मार्जिनसाठी व्याज दर 4% प्रतिवर्ष ठेवण्यात आला आहे.
एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजना पात्रता | SBI Stree Shakti package scheme eligibility criteria –
– अर्जदार भारतीय असणे आवश्यक आहे.
– व्यवसायासाठी ज्या महिलेकडे 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मालकी असेल अशा महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– या योजनेअंतर्गत फक्त महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– सीए, डॉक्टर तसेच वास्तु विशारद यांसारख्या नोकरदार सेवांमध्ये काम करणाऱ्या महिला सुद्धा कर्ज मिळवण्यासाठी पात्र असतील.
– या योजनेअंतर्गत किरकोळ व्यवसाय सेवा प्रदात्यासारख्या छोट्या व्यवसाय युनिटसाठी सुद्धा कर्ज दिले जाते.
एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | SBI Stree Shakti package yojana necessary documents –
– आधार कार्ड
– पत्त्याचा पुरावा
– ओळखपत्र
– कंपनी मालकीचे प्रमाणपत्र
– मागील 2 वर्षांचा आयटीआर
– उत्पन्न प्रमाणपत्र
– बँक स्टेटमेंट
– कंपनीमध्ये भागीदार असल्यास आवश्यक कागदपत्रे
– मोबाईल नंबर
– पासपोर्ट साईज फोटो
– पुराव्यासह व्यवसाय योजना नफा आणि तोटा विवरण
एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजनेसाठी अर्ज | SBI Stree Shakti package scheme application –
– या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी नजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जावे.
– त्यानंतर एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज या योजने संदर्भातील माहिती त्या ठिकाणावरून घेऊन तेथील कर्मचाऱ्यांकडून या योजनेसाठीचा अर्ज आपल्याला मिळेल.
– एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा अर्ज व्यवस्थित रित्या भरून अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
– त्यानंतर हा अर्ज एसबीआय बँकेमधील कर्मचाऱ्यांकडे जमा करावा.
– यानंतर आपल्या अर्जाची संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यवस्थितरित्या पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर जर आपण पात्र असू तर कर्जाची रक्कम आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते.
एसबीआय स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत समाविष्ट असणारे व्यवसाय | Businesses under SBI Stree Shakti package scheme –
– कृषी उत्पादनांचा व्यापार
– 14C साबण आणि डिटर्जंट व्यवसाय
– दुग्ध व्यवसाय
– कपडे उत्पादन व्यवसाय
– पापड बनवण्याचा व्यवसाय
– खतांची विक्री
– कुटीर उद्योग जसे की मसाले किंवा अगरबत्ती निर्मिती व्यवसाय आणि इतर
– कॉस्मेटिक वस्तू किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय
⭕ कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय
⭕जाणून घ्या अधिक माहिती …
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻