Post Office Saving Schemes | Post office Bachat Yojana | पोस्ट ऑफिस बचत योजना –
आपल्या सर्वांसाठीच आर्थिक बचत करणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी विविध स्कीम्स मध्ये किंवा योजनांमध्ये आपण आर्थिक गुंतवणूक करत असतो. काही योजनांमध्ये आपल्याला चांगला फायदा होतो तर काही योजना फ्रॉड सुद्धा निघतात परंतु पोस्ट ऑफिस बचत योजना ह्या लोकांना नेहमीच विश्वासार्ह वाटतात आणि त्यामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याची इच्छा सुद्धा लोकांमध्ये नक्कीच असते किंबहुना बऱ्याचशा लोकांनी गुंतवणूक केलेली सुद्धा आहे. आज अशाच काही पोस्ट ऑफिस बचत योजनेबद्दल ( Post Office Saving Schemes ) आपण माहिती जाणून घेणार आहोत…
आजच्या लेखामध्ये आपण पुढील पोस्ट ऑफिस बचत योजनेबद्दल ( Post Office Saving Schemes ) जाणून घेणार आहोत:
1. किसान विकास पत्र (KVP) योजना [Kisan Vikas Patra Yojana]
2.ज्येष्ठ नागरिक बचत योजना [ Senior citizen saving scheme (SCSS) ]
3 . राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे [ National Saving Certificate (NSC) Scheme ]
Table of Contents
Post Office Saving Schemes | Post office Bachat Yojana | पोस्ट ऑफिस बचत योजना –
1. किसान विकास पत्र (KVP) योजना | Kisan Vikas Patra Yojana –
– लोकांना दीर्घकालीन गुंतवणूक करता यावी त्याचबरोबर बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी किसान विकास पत्र योजना ही एक चांगली योजना आहे.
– किसान विकास पत्र योजना ही पूर्वीपासून सुरू होती परंतु काही कालावधीनंतर ही योजना बंद करण्यात आली होती परंतु भारत सरकारने 2014 मध्ये किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरू केली.
– वित्त मंत्रालयाने केलेल्या घोषणेवर आधारित किसान विकास पत्र योजनेसाठी व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात,परंतु सध्या लागू असलेला व्याज दर 7.5% प्रतिवर्ष आहे आणि ह्या नुसार 115 महिन्यांमध्ये गुंतवणूक दुप्पट करेल.
– सध्याच्या नियमांनुसार, किसान विकास बचत प्रमाणपत्रे सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्याच बरोबर भारतातील पोस्ट ऑफिसमधून खरेदी केली जाऊ शकतात.
– खात्रीशीर रिटर्न्स मिळवण्यासाठी सुद्धा किसान बचत पत्र योजनेचा विचार नक्की केला जाऊ शकतो.
2 . ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Senior citizen saving scheme (SCSS) –
– ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही योजना भारतामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
– 60 पेक्षा अधिक वर्षांची व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
– कमीत कमी हजार रुपये गुंतवणूक या योजनेसाठी करावी लागते.
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षे आहे , त्यानंतर सुद्धा लाभार्थी तीन वर्षापर्यंत कालावधी वाढवू शकतात.
– जमा करण्यात आलेली कमाल रक्कम ही 15 लाखांपेक्षा जास्त नसावी.
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत सध्या ८ टक्के व्याजदर मिळते.
– ज्यांनी वॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे, परंतु त्या व्यक्तींचे वय 55 ते 60 वर्षा दरम्यान आहे असे व्यक्ती सुद्धा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत नॉमिनेशन फॅसिलिटी सुद्धा दिली जाते.
3 . राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे | National Saving Certificate (NSC) Scheme –
– लोकांना बचत करता यावी किंवा बचतीची सवय व्हावी यासाठी भारत सरकारने सुरू करण्यात आलेल्या योजनांपैकी एक योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना.
– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी किमान गुंतवणूक १००० रुपये आहे आणि १०० च्या पटीत कितीही,परंतु गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
– NSC व्याज दर 7.7% p.a आहे.
– डिपॉझिट केलेल्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युअर होईल.
किसान विकास पत्र (KVP) योजना ( Kisan Vikas Patra Yojana ),ज्येष्ठ नागरिक बचत योजना [ Senior citizen saving scheme (SCSS) ],राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे [ National Saving Certificate (NSC) Scheme ] ह्या पोस्ट ऑफिस बचत योजनेबद्दल ( Post Office Saving Schemes ) आपण थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती बघितली. या पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी वेगवेगळ्या योजनेसाठी पात्रता आहे परंतु एक महत्त्वाची पात्रता म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
⭕ आठवी किंवा चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण..
⭕जाणून घ्या अधिक माहिती…
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻