मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana | CM Vayoshree Scheme | Best Government schemes 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana | CM Vayoshree Scheme 

      लहान बालकांपासून ते वयो वृद्धांपर्यंत विविध प्रकारच्या योजना राज्य सरकार तर्फे आणि केंद्र सरकार तर्फे राबवल्या जात असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 5 फेब्रुवारी 2024 या दिवशी मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshree Yojana)  घोषित करण्यात आली.ही योजना 65 वर्षावरील नागरिकांसाठी आहे. जाणून घेऊयात मुख्यमंत्री वयोश्री योजना या बद्दल अधिक माहिती…

Mukhyamantri Vayoshree Yojana

– मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 5 फेब्रुवारी 2024 रोजी केली.

– “मुख्यमंत्री वयोश्री योजना ”  ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी असून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता या योजनेला मिळालेली आहे.

– केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यांमधील काही निवडक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते परंतु मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.

– जवळपास 480 कोटी रुपयांच्या खर्चास “मुख्यमंत्री वयोश्री योजना ” या योजनेसाठी मान्यता मिळालेली आहे.

– 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्याच बरोबर वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन लाखांपर्यंत असलेल्या जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार आहे.

– ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व तसेच अशक्तपणा निराकरण करण्यासाठी आवश्यक ती उपकरणे खरेदी करणे त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

– आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे स्क्रिनींग,सर्वेक्षण करण्यात येऊन पात्र नागरिकांची तपासणी करण्यात येईल ,पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना ३००० रुपये एकरकमी थेट बँक खात्यात मिळेल.

Mukhyamantri Vayoshree Yojana Eligibility criteria | मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता –

– अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असावेत. 

– काही मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असलेले ज्येष्ठ नागरिक पात्र असू शकतात.

 – अर्जदाराचे वय 65 वर्षे असावे.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ

महाराष्ट्रामधील 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत तपासणी केली जाईल आणि जे पात्र ठरतील त्यांना 3,000 रु. आर्थिक लाभ  मिळणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज | Mukhyamantri Vayoshree Yojana Application –

 महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केली,म्हणून अर्जा बद्दल माहिती अद्याप पर्यंत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु लवकरच मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील ,पात्रता काय याबद्दलची माहिती कळू शकेल.

⭕ कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय 

⭕जाणून घ्या अधिक माहिती …

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया –

⭕ जाणुन घ्या अधिक माहिती..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/balloon-decorator-business/#google_vignette

Leave a Comment