5 DIY business ideas | मॅनपावर न लागता स्वतः सुरू करता येणारे व्यवसाय
जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी तसेच आयुष्यामध्ये लागणाऱ्या इतर गोष्टींसाठी पैसे कमावण्याची आवश्यकता असते, थोडक्यात प्रत्येक मनुष्य आपली सध्या असणारी आर्थिक परिस्थिती अजून जास्त सुधारावी यासाठी प्रयत्न करत असतो. काही व्यक्ती नोकरी करतात तर काही व्यवसाय करतात तर काही दोन्ही करतात, परंतु काही व्यक्ती असे असतात की त्यांना नोकरी करायची नसते व्यवसाय तर करायचा असतो परंतु व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल किंवा मॅनपावर त्यांच्याकडे नसते, म्हणूनच अशा लोकांसाठी आपण मॅनपावर न लागता स्वतः सुरू करता येणारे व्यवसाय ( DIY business ideas ) बघणार आहोत.
Table of Contents
5 DIY business ideas | मॅनपावर न लागता स्वतः सुरू करता येणारे व्यवसाय
DIY Business Idea No. 1.पेंटिंग आणि आर्ट्स | Paintings and arts –
– जर तुम्ही पेंटर किंवा आर्टिस्ट असाल तर ही तुमच्यासाठी अगदी परफेक्ट बिझनेस आयडिया आहे.
– वेगवेगळ्या आर्ट पीसची आणि उत्कृष्ट पेंटिंगची सर्वत्र डिमांड आहे.
– या व्यवसायामध्ये मिळणारा प्रॉफिट हा आपण कशा प्रकारचे काम करतो, आपल्या कामाची गुणवत्ता यावरून ठरतो.
– हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने मार्केटिंग केल्यास सुद्धा चांगल्या रीतीने चालू शकतो, त्यासोबतच ऑफलाइन पद्धतीने मार्केटिंग केल्यामुळे सुद्धा चांगल्या ऑर्डर्स मिळू शकतात.
– तसेच आपल्या आर्ट्स आणि पेंटिंगचे प्रदर्शन भरून सुद्धा चांगली अर्निंग केली जाऊ शकते.
DIY Business Idea No. 2 केकचा व्यवसाय | Cake business –
– हल्ली अगदी कुठलंही सेलिब्रेशन असो किंवा नसेल तरीसुद्धा बरेच लोक केक आवडीने खातात परंतु प्रत्येक जणाला बेकरी मधील केक आवडेलच असे नाही त्यामुळे बरेचसे लोक घरगुती पद्धतीने बनवलेला केक खाणे पसंत करतात आणि घरगुती केक बनवणाऱ्या व्यक्तींना केकच्या ऑर्डर सुद्धा देतात.
– त्यामुळे तुम्हाला सुद्धा केक बनवता येत असेल तर हा व्यवसाय सुरू करू शकता आणि केक बनवता येत नसेल तरीसुद्धा हल्ली वन डे केक वर्कशॉप बऱ्याच ठिकाणी घेतले जातात आणि ते वर्कशॉप करून सुद्धा आपण उत्कृष्ट असा केक बनवू शकतो.
– त्यामुळे केक बनवण्याचा व्यवसाय आपल्या घरामधून सुद्धा सुरू केला जाऊ शकतो आणि त्यामध्ये व्हरायटी ऑफर करून तसेच वेगवेगळ्या डिझाइन्स ऑफर करून ग्राहकांची मने आपण जिंकू शकतो आणि या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो.
DIY Business Idea No. 3 ज्वेलरी व्यवसाय | Jwellery Business –
– प्रत्येक स्त्रीला आवडणारी गोष्ट म्हणजे ज्वेलरी. स्त्रियांसोबतच पुरुषांसाठी सुद्धा विविध प्रकारची ज्वेलरी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ज्वेलरी व्यवसाय हा नेहमीच फायद्यात असणारा व्यवसाय आहे.
– ज्वेलरी व्यवसाय हा आपण आपल्या घरामधून सुद्धा सुरू करू शकतो त्यासाठी इतर मॅनपावरची सुद्धा आवश्यकता नाही.
– होलसेलर कडून ज्वेलरी खरेदी करून योग्य त्या दराने विकल्यास चांगला नफा ज्वेलरी व्यवसायामधून मिळू शकतो, गरज आहे ती फक्त ग्राहकांना कोणत्या प्रकारची ज्वेलरीची आवश्यकता आहे हे ओळखण्याची…
DIY Business Idea No.4 कस्टमाईजड गिफ्ट बॉक्सेस | Customised gift boxes –
– हल्ली कुठलाही कार्यक्रम असो एनिवर्सरी, वाढदिवस, पार्टी ,सेलिब्रेशन तर अशावेळी एकमेकांना गिफ्ट आवर्जून दिले जातात परंतु आता गिफ्ट देताना सुद्धा कस्टमाईजड गिफ्ट बॉक्सेस मध्ये गिफ्टस पॅकिंग करून दिले जातात.
– विविध प्रॉडक्ट ओनर्स किंवा शॉप ओनर्स सुद्धा ग्राहकांना खुश करण्यासाठी कस्टमाईजड गिफ्ट बॉक्सेस देतात.
– म्हणूनच जर अशा प्रकारची बॉक्सेस आपण बनवून दिली तर हा सुद्धा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो त्यासाठी आपल्याला फक्त गरज आहे क्रिएटिव्हिटीची आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची…
– आपण कस्टमाईजड गिफ्ट बॉक्सेस बनवून देतो ,अशी मार्केटींग योग्य रीतीने केली की आपोआपच कस्टमर आपल्याला मिळू लागतील
DIY Business Idea No. 5 प्रिंटिंग व्यवसाय |Printing Business –
– सध्या प्रिंटिंग व्यवसायाला खूप स्कोप आहे.
– प्रिंटिंग व्यवसायामध्ये आपण प्रिंटिंग मशीन खरेदी करून टी-शर्ट, मग, कॅप,मोबाईल कव्हर अशा विविध प्रॉडक्ट वर प्रिंटिंग करू शकतो किंवा प्रिंटिंग मशीन खरेदी करायची नसल्यास हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करता येऊ शकतो ,त्यासाठी print on demand सारख्या विविध वेबसाईट उपलब्ध आहेत. आपल्या चॅनलवर याबद्दल डिटेल व्हिडिओज आहेत नक्की चेक करा.
– प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा मॅनपावरची आवश्यकता नसते हा व्यवसाय आपण स्वतः मॅनपावर न घेता सुरू करू शकतो.
अशा रीतीने असे विविध व्यवसाय ( DIY business ideas ) उपलब्ध आहेत की जे मॅनपावर न लागता सुरू केले जाऊ शकतात.
⭕ कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय
⭕जाणून घ्या अधिक माहिती …
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/mobile-cover-printing-business/