आलं – लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय | Ginger garlic paste making business –
आलं आणि लसूण हे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये आवर्जून वापरले जातात.परंतु सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी रेडीमेड पद्धतीने वापरल्या जातात आणि अशीच एक गोष्ट म्हणजे आलं-लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट कुठल्याही पदार्थाचा स्वाद तर वाढवते, त्यामुळे आवर्जून बऱ्याचशा पदार्थांमध्ये आलं लसूण पेस्ट वापरली जाते. आलं आणि लसूण जेवणाचा स्वाद तर वाढवतात त्याचबरोबर आलं आणि लसूण चे बरेचसे फायदे आपल्या शरीरासाठी सुद्धा आहेत.बऱ्याच ठिकाणी कामाची गडबड असल्याकारणाने आलं-लसूण पेस्ट घरी न बनवता रेडीमेड विकत आणली जाते. आलं लसूण पेस्टला मागणी सुद्धा चांगली असल्याकारणाने हा व्यवसाय सुरू केला तर फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊयात आलं लसूण पेस्ट बनवण्याच्या व्यवसायाबद्दल ( Ginger garlic paste making business) अधिक माहिती…
Table of Contents
How to start ginger garlic paste making business | अद्रक आणि लसूण पेस्ट हा व्यवसाय का सुरू करावा –
१ . आलं-लसूण पेस्ट बनवण्याच्या व्यवसायासाठी योजना | Business planning for ginger garlic paste making business –
– कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करणे फार महत्त्वाचे आहे.
– व्यवसाय योजना तयार करत असताना त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो:
– हा व्यवसाय तुम्ही कोठे सुरू करणार आहात ?
– या व्यवसायासाठी किती भांडवल लागू शकते ?
– या व्यवसायासाठी लागणारा आवश्यक कच्चा माल कोणता ?
– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते मशीन लागतात?
– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते परवाने लागतात ?
अशा सर्व गोष्टींचा विचार करून व्यवस्थित व्यवसाय योजना तयार करा.
२ . आलं-लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठिकाण | location for ginger garlic paste making business –
– तुम्ही जर हा व्यवसाय छोट्या स्तरावर आणि कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर अगदी स्वतःच्या घरामधून सुद्धा हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.
– परंतु जर जास्त गुंतवणूक करून मोठ्या स्तरावर हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर यासाठी लागणारी आवश्यक मशीन खरेदी करून याचे एक युनिट स्थापन करू शकता.
३ . आलं-लसूण पेस्ट बनवण्यासाठी लागणारा आवश्यक कच्चा माल | Raw material required for making ginger garlic paste –
– या व्यवसायासाठी आलं-लसूण हा मुख्य कच्चामाल आहे. आलं आणि लसूण जर होलसेल दराने खरेदी केले तर प्रॉफिट मार्जिन नक्कीच चांगले मिळू शकते यासाठी थेट शेतकऱ्यांशी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्या शेतामधून थेट मालाची खरेदी करू शकता.
– काही पॅकेजिंग मटेरियल जसे की प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटल्स, प्लास्टिक पाऊचेस आणि लेबल संबंधित सामग्री.
– फूड प्रीझर्व्हेटिव्ह : आलं लसूण पेस्ट किंवा इतर काही खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात.
४ .आलं-लसूण पेस्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या मशीन | Machines required for making ginger garlic paste –
आलं-लसूण पेस्ट बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मशिनरी मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक मशीन असे प्रकारे येतात.
पुढील काही मशीन आलं-लसूण पेस्ट बनवण्यासाठी गरजेच्या आहेत –
– वॉटर जेट वॉशर
– लसूण बल्क कटिंग मशीन
– लसूण पिलिंग मशीन
– अद्रक पीलिंग मशीन
– अद्रक आणि लसूण पेस्ट तयार करण्याचे मशीन
– पेस्ट मिक्सर मशीन
– वेट मशीन /वजन काटा
– पॅकेजिंग मशीन
५ .मशीन वापरून आलं-लसूण पेस्ट कशी बनवायची | How to make ginger and garlic paste –
– वॉटर जेट मशीनच्या मदतीने आलं-लसूण स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुतले जातात, असे केल्यामुळे आलं लसणाला लागलेली माती किंवा कचरा पूर्णपणे निघून जातो.
– गार्लिक पिलिंग मशीनच्या मदतीने आलं आणि लसणाची साले काढली जातात.
– आलं-लसूण पेस्ट बनवण्यासाठी आलं आणि लसूण क्रशर मशीन मध्ये टाकली जातात.
– यानंतर मिक्सर मशीन मध्ये ही पेस्ट टाकून आलं-लसूण एकत्रित चांगले मिसळले जातात.
– यानंतर मोठ्या स्टीलच्या टाकीमध्ये ही पेस्ट टाकून त्यामध्ये मसाले टाकायचे असल्यास किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात.
– सगळ्यात शेवटी आलं-लसूण पेस्ट पॅकिंग केली जाते.
६ . आलं-लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने | licence required for ginger garlic paste making business –
– कोणत्याही व्यवसायासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
– आलं-लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय खाद्यपदार्थ अंतर्गत येत असल्यामुळे,हा व्यवसाय सुरू करण्यासाठी FSSAI ( food safety and standards authority of India) हे लायसन्स असणे आवश्यक आहे.
– जीएसटी रजिस्ट्रेशन करणे देखील गरजेचे आहे.
७ . आलं-लसूण पेस्ट व्यवसायाची मार्केटिंग | Marketing –
– आलं-लसूण पेस्ट ही घरामध्ये तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर हॉटेल, सुपर मार्केट, कॅन्टीन, मेस ,भोजनालय, केटरिंग सेवा ,होस्टेल्स ,हर्बल उत्पादन तयार करणारे मॅन्युफॅक्चरर्स यांच्याशी संपर्क साधून मोठ्या ऑर्डर्स मिळवू शकता.
– आलं-लसूण पेस्ट ऑनलाईन पद्धतीने देखील विकता येऊ शकते. आजकाल विविध वेबसाईट उपलब्ध आहे त्यावरती तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकता किंवा तुमच्या ब्रँडची स्वतःची वेबसाईट सुरू करू शकता.
– सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता.
– आलं-लसूण पेस्ट व्यवसायाला चांगले ब्रँड नेम देऊन विविध अॅडव्हर्टायझिंग पद्धती वापरून चांगली मार्केटिंग करता येऊ शकते.
अशाप्रकारे आले-लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
⭕ व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज..⭕ Government Loan Schemes ⭕ जाणून घ्या कोणत्या सरकारी योजना आहेत…👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://www.viral-talk.in/government-loan-schemes/?amp=1