Car accessories business in Marathi | कार ॲक्सेसरीज बिजनेस | Best business ideas for 2024

Car accessories business in Marathi | कार ॲक्सेसरीज बिजनेस – 

    बऱ्याच घरांमध्ये फोर व्हीलर असते. फोर व्हीलर साठी सुद्धा विविध ॲक्सेसरीज असतात. या ॲक्सेसरीजच्या मदतीने फोर व्हीलर कार आपण पहिल्यापेक्षा अधिक ऍडव्हान्स बनवू शकतो. बरेचसे लोक कार ॲक्सेसरीज ऑनलाइन खरेदी न करता प्रत्यक्ष खरेदी करणे पसंत करतात. त्यामुळे कार ॲक्सेसरीज बिजनेस एक चांगली बिझनेस आयडिया ठरू शकते. कार ॲक्सेसरीज सोबतच इतर वाहनांच्या ॲक्सेसरीजची विक्री सुद्धा आपल्याला करता येऊ शकते.

Car accessories business

– कार ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करत असताना व्यवसाय योजना तयार करा.

– कार ॲक्सेसरीजच्या बिजनेस प्लॅनमध्ये तुम्ही ग्राहकांना कोणत्या ॲक्सेसरीज आणि इन्स्टॉलेशन सर्विसेस उपलब्ध करून देणार आहात याची लिस्ट करा.

– त्याचबरोबर स्टार्टअप खर्चाची यादी, ज्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करणार आहात ती जागा जर स्वतःची नसेल तर त्याचे भाडे, मार्केटिंग खर्च याप्रकारे येणाऱ्या खर्चाची सुद्धा एक यादी बनवा.

– अशाप्रकारे कार ॲक्सेसरीज व्यवसायामध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थित असा बिजनेस प्लान तयार करा.

– कार ॲक्सेसरीज हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणते परवाने लागतात याबद्दल माहिती घेऊन सर्व आवश्यक ते परवाने घ्या त्यामध्ये व्यापार परवाना, जीएसटी रजिस्ट्रेशन यांचा समावेश होऊ शकतो.

– व्यवसायासाठी परवाने घेणे तर आवश्यक आहेच त्यासोबतच कार ॲक्सेसरीजच्या व्यवसायासाठी व्यवसाय विमा सुद्धा खरेदी करा जेणेकरून भविष्यामध्ये उत्पादनांची चोरी किंवा इतर काही नुकसान झाले तर त्यावेळी विमा नक्की उपयोगी ठरेल.

– तुमच्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी शॉपिंग मार्केट आहे ते ठिकाण कार ॲक्सेसरीज व्यवसायासाठी निवडा.

– किंवा इतर गर्दीची ठिकाणी ज्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी असते असे ठिकाण कार ॲक्सेसरीज व्यवसायासाठी निवडा.

– कार ॲक्सेसरीज साठी मोठी जागा असणे आवश्यक आहे जेणेकरून ग्राहकांना कार ॲक्सेसरीज व्यवस्थित रित्या दाखवता येतील.

– कार ॲक्सेसरीज ॲक्सेसरीज उत्पादकाकडून किंवा होलसेल विक्रेत्याकडूनच खरेदी करा असे केल्यामुळे प्रॉफिट मार्जिन जास्त असते.

– सध्या कोणत्या कार ॲक्सेसरीज जास्त चालतात अशा कार ॲक्सेसरीज जास्त कॉन्टिटी मध्ये ठेवा.

– कार ॲक्सेसरीज ग्राहकांना दाखवण्यासाठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी डिस्प्ले रॅक आणि शेल्व्हिंग खरेदी करा.

– ग्राहकांना जर कार ॲक्सेसरीज व्यवस्थित रित्या बघता आल्या तर कार ॲक्सेसरीज खरेदीचे चान्सेस नक्कीच वाढतात.

– व्यवसाय छोटा असो किंवा मोठा व्यवसायाची मार्केटिंग योग्यरीत्या करणे खूप गरजेचे आहे.

– फ्लायर्स आणि बिझनेस कार्ड तयार करून कार ॲक्सेसरीज व्यवसायाची मार्केटिंग करा.

– त्याचबरोबर ऑटो रिपेअर शॉप, ऑटो डिटेलिंग सेवा आणि स्टिरिओ इंस्टॉलेशन व्यवसायांशी सुद्धा संपर्क साधा, जेणेकरून या व्यवसायिकांकडून सुद्धा कार ॲक्सेसरीजच्या ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात.

– आपल्याकडे स्टॉकमध्ये कार ॲक्सेसरीजचे कोणकोणते प्रकार उपलब्ध आहेत ते दाखवण्यासाठी वेबसाइट तयार करा. या वेबसाईट मध्ये आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स,ऑर्डर आणि पेमेंट पर्याय यांचा समावेश करा. 

– कार ॲक्सेसरीजचा व्यवसाय स्थानिक व्यवसाय निर्देशिकांमध्ये ( local business directories) लिस्ट करा.

– सोशल मीडिया हे सुद्धा मार्केटिंग करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे अगदी काही मिनिटांमध्येच आपण असंख्य ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकतो आणि आपल्या व्यवसायाबद्दल तसेच आपण उपलब्ध करून देत असलेल्या सर्विसेस बद्दल माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो.

    कार अलार्म, स्टिरीओ सिस्टीम यांसारख्या कार ॲक्सेसरीज कार सोबतच ट्रक किंवा इतर वाहनांच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागांमध्ये सुधारणा करण्यामध्ये मदत करतात. ज्या लोकांना त्यांचे वाहन आरामदायक आणि अधिक मनोरंजक असे बनवायचे आहे ते लोक वेगवेगळ्या कार ॲक्सेसरीज कार मध्ये बसवून घेत असतात. म्हणूनच कार ॲक्सेसरीज ( Car accessories business) हा व्यवसाय एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो ,त्यासाठी विविध वाहनांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीजचा स्टॉक आपल्याकडे असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच जर आपण ती कार ॲक्सेसरीज किंवा इतर वाहनांची ॲक्सेसरीज इन्स्टॉल करून देण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली तर नक्कीच आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो.

मकरसंक्रांत स्पेशल व्यवसाय कल्पना

Makar Sankranti special business ideas PART 2

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/makar-sankranti-special-business-ideas/?amp=1

Leave a Comment